ब्रेकिंग न्यूज

उसाच्या फडातून अल्पवयीन पीडितेची सुटका.

आरोपी ताब्यात;बीड AHTU ची धडाकेबाज कारवाई.

बीड – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU), बीड यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून उसाच्या फडामधून एका अल्पवयीन पीडित मुलीची सुटका करत आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.

पोस्टे वडवणी येथील गुन्हा रजिस्टर नंबर १७६/२०२४ कलम १३७(२), १४३(२) हा गुन्हा नुकताच AHTU कडे वर्ग झाला होता. पो.उ.नि. पल्लवी जाधव यांनी फाईलचे बारकाईने अवलोकन करून फिर्यादी व साक्षीदारांकडून मिळालेल्या मर्यादित माहितीनंतर तांत्रिक तपासाचा आधार घेत तपासाची दिशा निश्चित केली. मिळालेल्या तांत्रिक माहितीवरून पीडित मुलगी व आरोपी सांगली जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर ०८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता मा. एसपी नवनीत कावत सर यांच्या परवानगीने AHTU ची विशेष टीम सांगलीला रवाना झाली. दिवसभर शोधमोहीम राबवल्यानंतर पीडितेच्या वास्तव्याचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला. रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी व आरोपी हे दोघे उस तोडणीच्या फडातून बाहेर येताच टीमने त्यांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांना सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करून पुढील प्रक्रिया पूर्ण करत टीमने त्यांना बीडकडे रवाना केले.

त्यानंतर दोघांना पोस्टे वडवणी येथे हजर करून पुढील तपासाची सूत्रे गतीमान करण्यात आली आहेत.

   ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, प्रदीप येवले, अशोक शिंदे, जोशी योगेश निर्धार, अश्विन सुरवसे (AHTU, बीड) यांनी केली.

मानवी तस्करीविरोधातील ही कारवाई अत्यंत कौतुकास्पद ठरली असून PSI पल्लवी जाधव यांच्या दक्षतेमुळे एका अल्पवयीन मुलीची सुटका साध्य झाली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button