दिवसाढवळ्या दुकानात चोरी करणारी टोळी उघडकीस.
तीन लाखांचा मुद्देमाल जप्त;बीड शहर पोलिसांची कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड दिनांक 08/12/2025 रोजी बीड शहरातील कोहिनूर जनरल स्टोअर्स, बीड येथे इमिटेशन ज्वेलरीची चोरी झाल्याची माहिती बीड शहर पोलिसांना प्राप्त झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोरीमध्ये सहभागी असलेला रिक्षा चालक दिलशान खान पिता इस्माईल खान, वय 43 वर्ष, रा. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर यास चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून अंदाजे 40,000 रुपये किमतीची इमिटेशन ज्वेलरी तसेच अंदाजे 2.5 लाख रुपये किमतीची रिक्षा असा एकूण 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासात असे उघड झाले की मुख्य आरोपी दिलशान खान हा या टोळीचा प्रमुख असून तोच छत्रपती संभाजीनगरहून चार बुर्खाधारी महिलांना घेऊन बीड शहरात चोरी करण्यासाठी आणत असे, गर्दीच्या वेळेत खरेदीच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करून चोरी करणे आणि तत्काळ रिक्षाने परत निघून जाणे हीच त्यांची निश्चित पद्धत असल्याचे तपासात समोर आले आहे. चोरीमध्ये सहभागी असलेल्या चार बुर्खाधारी महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका इसमाचा पोलीस शोध घेत असून त्यांना अटक करणे बाकी आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सौ. पूजा पवार आणि पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बबन जाधव, शहेनशहा सय्यद, इलियास शेख, मंगेश शिंदे, रामेश्वर पवार आणि गहिनीनाथ बावनकर ,गोवर्धन सोनवणे यांनी केली आहे.









