वडवणी पोलिसांनी हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना केले परत.
हरवलेला मोबाईल परत मिळाले;नागरिक काय म्हणाले पहा.

बीड (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी व हरवण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात बीड पोलिसांना मोठे यश मिळत आहे.
वडवणी शहरातील आठवडी बाजार परिसरातून काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. संबंधित नागरिकांनी तत्काळ वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाचा आधार घेत हरवलेले मोबाईल शोधून काढण्याची मोहीम हाती घेतली.
या तपासामध्ये पांडुरंग सुखदेव कोळपे, रा. चिंचाळा यांचा Vivo V2109 मॉडेलचा मोबाईल लक्ष्मण केरबा बागडे, रा. वडवणी यांचा Vivo V29 Pro मोबाईल हे दोन्ही मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले. नंतर हे मोबाईल संबंधित नागरिकांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत वडवणी पोलीसांचे मनापासून आभार मानले.
पोलीस अधीक्षक बीड नवीनत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी श्रीमती वर्षा व्हगाडे,पो.उप.नि.श्याम गायकवाड, पो.अंमलदार विश्वजीत मुंडे, योगिराज कानतोडे, पो.अमेर सय्यद यांनी संयुक्तपणे हरवलेल्या मोबाईलचा तपास केला.
वडवणी पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध लावून नागरिकांना परत केल्याने या परिसरात पोलिसांची प्रशंसा होत आहे.







