बालसंस्कार वर्ग च्या दुसऱ्या शाखेचे उद्धाटन – अंबाजोगाई
धाकटे देवघर अंबाजोगाई येथे सम्पन्न.

*बालसंस्कार वर्गाच्या दुसऱ्या शाखेचे उदघाटन – धाकटे देवघर अंबाजोगाई येथे संपन्न*
अंबाजोगाई – ,प्रतिनिधी :–
दि ४ रोजी दुपारी ४ वाजता श्री दत्त जयंतीच्या मुहूर्तावर धाकटे देवघर देशपांडे गल्ली अंबाजोगाई येथे अखिल भारतीय पेशवा संघटना भारत शाखा अंबाजोगाई जिल्हा बीड संचलीत “बालसंस्कारवर्ग” च्या दुसऱ्या शाखेचे उदघाटन धाकटे देवघर अध्यक्ष श्री लक्षमिकांत गोस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक सचिन वाडेपटील संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय पेशवा सं. भारत आणि समन्वयक श्री संजय देशपांडे बीड जिल्हा यांच्या प्रयत्नातून झाले. यामध्ये मुलांना भारतीय संस्कृती ची माहिती,सूर्य नमस्कार,प्राणायाम, मंत्र पठण,श्लोक,स्तोत्र,चित्रकला, आर्ट अँड क्रॉफ्ट,खाद्य संसंस्कृती,या बाबतची माहिती आणि ज्ञान दिले जाणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ दिलीप कुलकर्णी यांनी केले. तसेच मार्गदर्शन, संस्कारवर्ग अनुभव यावर अंजली कुलकर्णी, उज्वला कुलकर्णी यांचे भाषणही झाले.या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लक्ष्मीकांत गोस्वामी यांचे लाभले. धाकटे देवघर या ठिकाणी असलेले भक्तगण ,लक्ष्मीकांत गोस्वामी,संजय देशपांडे, अभय जोशी,दुर्गादास दामोशन,विवेक वालेकर,अंजली कुलकर्णी, उज्ज्वला कुलकर्णी,डॉ दिलीप कुलकर्णी, मुकुंद घाटे,आदींची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
बालसंस्कार वर्गासाठी संपर्क – सौ स्मिता सुनील(दादा) दीक्षित,सौ मीना संजय सेलूकर,सौ नीलिमा महेश राडकर, सौ स्वाती संजय देशपांडे हे असतील असे अ. भा. पे. सं. भारत (अंबाजोगाई) यांनी सांगितले आहे.







