पाईपलाईन लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया.
पाईप लिकेज काढण्याचे काम सुरू;शहराला पाणीपुरवठा उशिरा होण्याची शक्यता.

बीड (प्रतिनिधी) – शहरातील बार्शी रोडवरील सोमेश्वर मंदिर पुलाजवळ असलेल्या मुख्य पाईपलाईनला मोठी गळती लागल्याने आज सकाळपासून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या गळतीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र गळती मोठी असल्याने पाणी प्रवाह थांबेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे.
बीड नगरपालिका कर्मचाऱ्या कडून वेळेवर दुरुस्ती न झाल्याने प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली असून, वारंवार होणाऱ्या पाईपलाईन गळतीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचा आरोप केला आहे. नगरपालिका प्रशासनाने मात्र लवकरच दुरुस्ती पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत होईल असा दावा केला आहे.
सोमेश्वर मंदिराजवळील बिंदुसरा नदी मध्येच पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे खेड्यातील घाण पाणी या पाईप मध्ये जाऊन शहराला दुर्गंधी फक्त पाणी येण्याची देखील शक्यता आहे. बीड शहरातील होणारी वारंवार पाणी गळती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पाणी गळतीमुळे शहराला पाणीपुरवठा उशिरा होण्याची देखील शक्यता आहे.







