मतमोजणी बाबत औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय.
निकालाची तारीख वाढल्याने उमेदवाराची धाकधुक वाढली.

महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुका २ डिसेंबर रोजी पार पडत आहे. मूळ वेळापत्रकानुसार निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार होता. मात्र नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आणि निकाल २१ डिसेंबरपर्यंत स्थगित केला गेला. यामुळे राज्यभरातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली होती.
या निर्णयामुळे उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये संभ्रम आणि ताण निर्माण झाला होता. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अनिश्चिततेमुळे उमेदवार अक्षरशः बेचैन झाले होते.
दरम्यान आज औरंगाबाद खंडपीठात या मुद्यावर महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने नागपूर खंडपीठाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे २०२५ च्या नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आणि अधिकृत निकाल २१ डिसेंबर रोजीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निर्णयामुळे निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी आणखी १९ दिवसांची प्रतिक्षा कायम राहणार असून राजकीय वातावरणात अनिश्चिततेची स्थिती कायम आहे. अनेकांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय ठरणाऱ्या या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.











