ब्रेकिंग न्यूज

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी काही तासांत जेरबंद.

जमिनीचा वाद;सख्या भावाने लाकडी दांड्याने डोक्यात जबर मारहाण केल्याने मृत्यू.

बीड (प्रतिनिधी) – बार्शी नाका, इमामपूर रोड परिसरातील राहुल नगरमध्ये सख्या भावांमध्ये सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून शुक्रवारी (दि. 29 नोव्हेंबर) रात्री घडलेल्या खुनाच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. या प्रकरणातील आरोपीला पेठ बीड पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. लाकडी दांड्याने डोक्यात जोरात प्रहार केल्याने सचिन फरताळे हा गंभीर जखमी झाला होता, परंतु त्याला आज सकाळी उठल्यावर रक्ताच्या उलट्या झाल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला यामुळे एकच खळबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला जमिनीचा वाद काल रात्री चिघळला. यादरम्यान निशिकांत उर्फ पिनू शहादेव फरताडे यांनी लाकडी दांड्याने भाऊ सचिन शहादेव फरताडे यांच्या डोक्यात प्राणघातक वार केल्याची माहिती मृतकाच्या आईने दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे. गंभीर जखमी अवस्थेत सचिनचा मृत्यू झाला.

या प्रकरणी गु.र.न. 338/2025 अंतर्गत कलम 103(1), 118(1), 115(2), 351(2), 351(3) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   खुनाच्या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता; मात्र पेठ बीड पोलीस स्टेशनचे अंमलदार अजय सानप व अल्ताफ शेख यांनी राबवलेल्या शोध मोहीमेत आरोपीला काही तासांत मोठ्या सीताफिने ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. पोलिस पथकाच्या या जलद आणि तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button