ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज ! बीड प्रभाग ३ ‘ब’ मधील नगरसेवक निवडणूक स्थगित.

अमर नाईकवाडे/अमृत सारडा मध्ये होणार काटे की टक्कर.

 

बीड –बीड नगरपालिकेमध्ये मत धनश्री दोन दिवस उरले असतानाच बीड शहरातील प्रभाग क्रमांक ३ ‘ब’ मधील नगरसेवक पदासाठी भाजपकडून अमृत सारडा तर राष्ट्रवादीकडून अमर नाईकवाडे हे उमेदवार रिंगणात असल्याने या प्रभागात चुरशीची लढत अपेक्षित होती. मात्र अर्जातील वादामुळे या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.

अवघ्या बीड शहराचे लक्ष लागून असलेली प्रभाग क्रमांक तीनची निवडणूक अटीतटीची व काट्याची टक्कर होणार असल्याची चर्चा शहरभर होती; अमर नाईकवाडे यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर मतदार प्रभावी झाले होते तर या भागातीलच भाजपचे अमृत सारडा यांनी व्यापाऱ्याच्या गाठीभेटी घेत विकास आमच्याच माध्यमातून झाला आहे अशी माहिती दिली होती. यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली होती

अमर नाईकवाडे यांनी अमृत सारडा यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगाने हा अर्ज वैध धरला असला तरी या निर्णयाविरोधात नाईकवाडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण आहे प्रविष्ट असल्याने या प्रभागातील वाद राज्य निवडणूक आयोगाच्या दखलदारपणात गेल्याने २ डिसेंबर रोजी होणारी नगरसेवक निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

निवडणूक स्थगित झाल्यामुळे या प्रभागातील मतदान प्रक्रिया आता २० डिसेंबर रोजी पार पडणार असून २१ डिसेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. या प्रकरणामुळे प्रभागातील राजकीय वातावरण तापले असून दोन्ही बाजूंकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, २ डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक ३ मधील नगराध्यक्ष पदाची तसेच ३ ‘अ’ प्रभागातील निवडणूक मात्र वेळेवर होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

वाद, आक्षेप आणि न्यायालयीन प्रक्रियांमुळे प्रभाग ३ ‘ब’ मध्ये अनिश्चितता निर्माण झाली असून मतदारांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button