ब्रेकिंग न्यूज

बीड नगरपालिका प्रचारार्थ डॉ.योगेश क्षीरसागर,मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद.

डॉ.योगेश क्षीरसागरानी गाण्यावर धरला ठेका.

बीड (प्रतिनिधी)बीड नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शहरात सभांचा जोर वाढला आहे. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बीड शहरातील सर्वच प्रभागांमध्ये सभांचे आयोजन केले असून या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. क्षीरसागर यांच्या सक्रिय प्रवेशामुळे व प्रवेशानंतर गाठीभेटी व कॉर्नर सभामुळे विरोधकांनाही धक्का बसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

चार दिवसांपूर्वी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी देखील प्रचार सभांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत पुतणे योगेश शिरसागर यांना खुलेआम पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या पाठिंब्यामुळे या निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे.

दरम्यान, भाजपा नेत्या पंकजा मुंडे बीड शहरात दाखल होताच शाहूनगर भागात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पंकजा मुंडे आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी उसळली. कार्यकर्त्यांनी योगेश क्षीरसागर यांना डोक्यावर उचलून घेत उत्साहात नाचत पंकजा मुंडे यांच्या गाण्यावर ठेका धरला. संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

या सभेमध्ये उत्साह, जल्लोष आणि आनंदाचा उच्चांक गाठत भाजपच्या प्रचाराला चालना मिळाल्याचे प्रत्यक्ष दिसून आले. क्षीरसागर–मुंडे यांच्या उपस्थितीमुळे बीडच्या राजकारणात नवा उर्जा संचारल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button