ब्रेकिंग न्यूज

एम आय एम ची सभा हाउसफुल ! सभेची गर्दी पाहून विरोधकांना भरली धडकी.

‘पतंग’ घेणार गगनभरारी;हाऊसफुल सभेमुळे विरोधकात चिंतेचे वातावरण.

बीड(प्रतिनिधी)बीड नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. केवळ चार दिवसांवर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागांमध्ये दिवसभर सभा, पदयात्रा आणि जनसंपर्काचा धडाका सुरू आहे. अशातच बीड येथील एम आय एम पक्षाच्या जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफिक भाऊ यांच्या सभेला झालेल्या अभूतपूर्व गर्दीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता बीड शहरात मोमीनपुरा भागात एमआयएम च्या  सभेचे आयोजित करण्यात आले होते ही सभा अक्षरशः हाऊसफुल झाली. कार्यक्रमस्थळी नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती एवढी मोठी होती की अनेकांना सभास्थळाबाहेरच थांबावे लागले. एम आय एम च्या सभेला मिळालेला हा जबरदस्त जनसमर्थन पाहून प्रतिस्पर्धी पक्षांच्या खांद्यावर एक प्रकारे धडकी बसल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नेते इम्तियाज जलील यांची उपस्थित राहिल्याने तरुणात व एमआयएमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.सभेत जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफिक भाऊ यांनी नगरपरिषदेसाठी एम आय एम कडून मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांवर नागरिकांशी थेट संवाद साधला. शहराच्या विकासाला पर्यायी दिशा, सामान्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका आणि नव्या नेतृत्वाला मिळालेला प्रतिसाद यामुळे यंदाच्या निवडणुकीत एम आय एम चा ‘पतंग’ जोरदार गगनभरारी घेईल, अशी चर्चा शहरभर सुरू झाली आहे.

राजकीय घडामोडींनी चुरशीच्या टप्प्यात प्रवेश केला असून, बीडच्या रणधुमाळीत एम आय एम ने दाखवलेली ताकद आगामी निकालांमध्ये कोणते बदल घडवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र या सभेतील गर्दीकडे पाहून कर्जकराने की धडके भरल्याचे दिसत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button