
बीड – जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिलेल्या सूचनांनुसार अंबाजोगाईत मोठी कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका कारवर टाकलेल्या छाप्यात तब्बल ₹25,26,200/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या गुप्त बातमीनुसार बर्दापुर येथून अंबाजोगाईकडे एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून अवैध गुटखा वाहतूक केली जात असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने शेलू अंबा रोडवरील टोलनाक्याजवळ सापळा लावून संशयित वाहन क्रमांक MH-14-GU-0699 अडवले.वाहनाची तपासणी केल्यावर त्यात विविध कंपन्यांचे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा आढळला. चालक हमीद सय्यद (वय 45, रा. साय्यद गल्लि, माजलगाव) याला ताब्यात घेण्यात आले. वाहनासह एकूण ₹25,26,200/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय दंडसंहितेसह इतर संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाईत पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पाकिस्तानी गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बेंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे/1429 केकान, 1837 गिते, पोना/1918 भताने व पोया 1055 अडके तसेच अंबाजोगाईचे सहाय्यक पोलिस अधीक्षक व तसेच संपूर्ण पथकाचा सहभाग होता.








