कमळ फुलवण्यासाठी प्रभाग २५ मध्ये आज माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांची जाहीर सभा.
अजिंक्य शिराळे व ज्योतीताई पिंगळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा.

बीड(प्रतिनिधी) बीड नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगू लागली असून प्रभाग क्रमांक २५ मध्ये राजकीय वातावरण तापले आहे. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला गती मिळत असताना आज बीड शहरातील स्वराज्य नगर प्रभागात महत्त्वाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
भाजप उमेदवार अजिंक्य बाबुराव शिराळे आणि सौ. ज्योतीताई नंदकुमार पिंगळे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते मा. जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनच्या उपस्थिती सभा होणार आहे.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्यांच्या उपस्थितीमुळे प्रभागातील राजकीय समीकरणांमध्ये नवीन चर्चांना उधाण आले आहे.
याआधी माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी पुतणे डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांना दिलेल्या पाठिंब्या नंतर भाजपच्या प्रचाराला“हत्तीचे बळ” मिळाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता जयदत्त क्षीरसागर यांच्या सभेमुळे प्रभाग २५ मधील निवडणुकीची हवा आणखीनच जोर धरू लागली आहे.
ही सभा आज सायंकाळी ७.३० वाजता स्वराज्य नगर येथे अबू लांडे यांच्या प्रगती किराणा दुकानाजवळ पार पडणार आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या सभे बद्दल उत्सुकता असून भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे.
उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांना मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहून विकास आराखडा, आश्वासने आणि भविष्यातील योजनां राबवण्या बाबत निर्णय घेणार आहेत.
आज दिनांक २५ नोहेंबर रोजी संध्याकाळी प्रभाग २५ मध्ये मोठी राजकीय गर्दी आणि उत्साहपूर्ण वातावरण पहायला मिळणार आहे.









