ब्रेकिंग न्यूज

पुरात वाहुन गेलेल्या तरुणाचा मृतदेह(सापळा)सापडला.

दोन महिन्यापूर्वी शिंदे पुराच्या पाण्यात वाहून गेले होते.

बीड( प्रतिनिधी )बीड जिल्हयासह मराठवाड्यात ऑगस्ट- सप्टेंबर महीन्यात 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसाने हाहाकार घातला होता.

   दिनांक 27 /09/ 2025 रोजी चौसाळा व परिसरात झालेल्या अतिवृष्टी पावसाने चौसाळा जवळील वाडवाना -पिंपळगाव रोडवरील नदीला पूर आला होता मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते त्यादिवशी रात्री चौसाळा येथील युवक स्वप्निल विक्रम शिंदे वय 33 वर्ष याचे नदीपलीकडे घर व शेती असल्याने रात्री नऊ वाजता मोटरसायकल वरून जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुलावरून जात असताना मोटरसायकल सहपुरात वाहून गेला दुसऱ्या दिवशी काही अंतरावर मोटरसायकल सापडली यावरून तो पाण्यात वाहून गेला असल्याचा अंदाज त्याच्या नातेवाईकांना आला त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही बीड जिल्हा स्तरावरून शोध पथके पाचारण केले होते परंतु त्यांनाही याचा शोध लागला नाही हे पथके तीन दिवस शोध घेत होते परंतु कुठेच शोध लागला नाही पंधरा ते वीस कि,मी शोधले परंतु पथकाला त्यात अपयश आले शेवटी शोध यंत्रणा बंद झाली परंतु दिनांक 23/ 11/ 2025 रोजी चौसाळा बायपास जवळील पुलाच्या खाली एका खड्ड्यातील झुडपात एक मानवाचा शरीराचा सापळा अडकलेला त्या परिसरातील ऊसतोड मजुरास व मासे पकडणाऱ्या व्यक्तीस तो दिसला त्यांनी त्याच्या कुटुंबातील व्यक्तीकडे मोबाईल द्वारे कळविले त्याचे नातेवाईक तात्काळ त्या ठिकाणी गेले व त्यांना त्याचे कपडे व खिशात मोबाईल अशा वस्तू मुळे ते प्रेत स्वप्नील शिंदे याचेच आहे असे ओळखले त्यानंतर त्या प्रेतावर दिनांक 23 /11 /2025 रोजी 05 वाजता चौसाळा येथे अंत्यसंस्कार केले स्वप्निलच्या मृतदेहाचा शोध तब्बल 2 महिन्यांनी लागल्यामुळे सर्वच आश्चर्य वाटत आहे स्वप्निल हा एकुलता एक होता त्याला एक सहा वर्षाचा मुलगा आहे स्वप्निल वाहून गेल्यानंतर अनेक नेत्यांनी त्याच्या घरी भेट देऊन शिंदे परिवाराचे सांत्वन केले स्वर्गवासी स्वप्निल यांच्या पश्चात आई वडील, पत्नी व एक मुलगा आहे त्याचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button