पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या.
मोबईलमधील चॅटिंग वाचलं अन् गौरी गर्जेनी टोकाचं पाऊल उचललं !

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. गौरी अनंत गर्जे असे तिचे नाव आहे. ही आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
अवघ्या दहा महिन्यांत त्यांचा संसार मोडला आहे. या आत्महत्येबद्दल माहिती मिळताच पंकजा मुंडे यांनी आपले सर्व नियोजित दौरे रद्द केले आहेत. काही महिन्यापूर्वीच अनंत गर्जेचे लग्न थाटामाटात पार पडले. कुटुंबियांकडून गंभीर आरोप केली जात असून ही आत्महत्या नाही तर हत्याच असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्यासोबत पीए म्हणून अनंत गर्जे काम करतोय. नुकताच मुलीच्या मामांनी खळबळजनक खुलासा केला. नक्की मुलीने आत्महत्या का केली? हेच त्यांनी सांगत अनंत गर्जेवर गंभीर आरोप केले. अनंत गर्जे आणि आमच्या मुलीमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते. तिने याबद्दल सर्व माहिती तिच्या वडिलांना दिली.
पीए अनंत गर्जे याचे बाहेर काही संबंध होते. याबद्दल तिला कळाले. यावरून दोघांमध्ये वाद होता. ज्यादिवशी मुलीने आत्महत्या केली, त्यादिवशी दोघांमध्ये खूप जास्त भांडणे झाली. तिने वडिलांना फोन देखील केला. या भांडणादरम्यानच तिने स्वतःला संपवल्याचे अनंत गर्जेने सांगितले. ज्यावेळी मुलगी स्वतःला संपवत होती, त्यावेळी अनंत गर्जे हा घरात होता, असेही त्याने आम्हाला सांगितले.
गौरी गर्जेला मारहाण होत असल्याचा आरोप
सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांनी प्रसार माध्यमांशी सांगितल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून हत्या की आत्महत्या हे पोलीस तपासात समोरील येईल.








