ब्रेकिंग न्यूज

लाच घेताना अभियंता एसीबीच्या जाळ्यात.

गेवराई पंचायत समितीतील अभियंत्याला बेड्या.

बीड दि.२२ (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील जवळपास सर्व शासकीय कार्यालयात टेबलाखालून पैसे,लाच दिल्याशिवाय कामच होत नसल्याच्या अनेक तक्रारी पहावयास मिळत आहेत. लाचखोरावर मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे.

   गेवराई पंचायत समिती कार्यालयातील अभियंता विनायक राठोड यास १,००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने शनिवारी दुपारी अटक केली. गाय-गोठा मंजुरीसाठी फाईल करण्याच्या कामाकरिता संबंधित शेतकऱ्याकडे राठोड यांनी लाचेची मागणी केली होती.

     घटनास्थळावरील माहितीनुसार, बुधवार (दि.१९ नोव्हेंबर) रोजी ही लाच बीड शहरातील अंबिका चौकातील एका प्रायव्हेट कार्यालयात मागितली गेली. तक्रारदार शेतकऱ्याने लाच देण्यास नकार देत तक्रार लाचलुचपत विभागाकडे दाखल केली. तक्रारीची खात्री झाल्यानंतर ACBने सापळा रचला. मात्र संशय आल्याने राठोड यांनी तक्रारदाराला टाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर एसीबीने पुढील तपासातून लाच मागणीचा पुरावा मिळवत त्यांना जेरबंद केले.

     ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे DYSP सोपान चिटंमपल्ले, अमोल खरसाडे मच्छिंद्र बिडकर सचिन काळे राजकुमार आघाव प्रदीप सुरवसे अंबादास पुरी  मार्गदर्शनाखाली शनिवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button