ब्रेकिंग न्यूज

माजी नगरसेवक सुनील महाकुंडे यांचा अफसर शेख व जोया मसेयूद्दीन यांना जाहीर पाठिंबा.

प्रभाग क्रमांक २४ मध्ये महाकुंडे यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने प्रचाराला उत्सुर्फ प्रतिसाद.

 

बीड(प्रतिनिधी)बीड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अफसर शेख व जोया मेसीसुद्दीन हे निवडणुकीच्या रिंगणात असून याच प्रभागातून महाकुंडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज आज मागे घेतला.

 या प्रभागाला सक्षम,व्यावसायिक व उच्चशिक्षित अफसर शेख व मेसीसुद्दीन यांना जाहीर पाठिंबा देऊन शुभेच्छा दिल्या.

बार्शी नाका भागातील प्रभाग क्रमांक २४ मधून शेख व मेसिद्दीन निवडणुकीच्या रिंगणात आहेत.प्रभाग क्रमांक 24 मधील विकासाची जाण असणारा चेहरा म्हणून ओळख आहे.

बार्शी नाका ढगे कॉलनी मोमिनपुरा परिसरातील पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा विद्युत या प्रश्नावर त्यांनी सातत्याने वेळोवेळी पाठपुरावा करून प्रशासनाचे व या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवल्याने त्यांना नागरिकांची पहिली पसंती आहे.

   गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकांमध्ये दुवा साधणाऱ्या व सुखदुःखात सामील होणाऱ्या या दोन्ही उमेदवारांची जनसंपर्कात भक्कम पकड असून वंचित, गरीब, आणि अल्पसंख्याक घटकांसाठी सातत्याने लढा दिल्याने त्यांच्यावरील जनविश्वास अधिक दृढ झाला आहे.

 प्रभागाच्या विकासात निर्णयाक असणारे सुनील महाकुंडे व राहुल महाकुंडे यांनी अफसर शेख व जोया मेसिद्दीन यांना पाठिंबा जाहीर करत या दोन्हीही उमेदवारांना स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button