आ.धनंजय मुंडे साहेब सिरसाळा येथे बोगस रस्ते पहा !
बोगस रस्ता कामाचा व्हिडिओ व्हायरल;नागरिकांनी दिला रस्ता रोको व उपोषणाचा इशारा.

बीड(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील परळी ही विविध कारणांने बदनाम होत असून नागरिकांनी बोगस डांबरी रस्त्याच्या व्हिडिओ व्हायरल करत संताप व्यक्त केला.
परळी तालुक्यातील सिरसाळा परिसरात सुरू असलेल्या रस्ते बांधकामातील अनियमितता आणि निकृष्ट कामाबाबत स्थानिक तरुणांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील निष्काळजीपणा आणि भ्रष्ट काम पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेक वर्षापासून हा रस्ता प्रलंबित असल्याने या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून या खड्ड्यात अपघात होऊन जीवितहानी देखील झाल्याची सांगण्यात आले.
व्हिडिओमध्ये नुकतेच झालेल्या डांबरीकरणाचा दर्जा अत्यंत खराब असून, रस्त्यावर टाकलेला डांबर हाताने सहज उखडता येत असल्याचे दिसून येते. तरुणांच्या मते, दर्जाहीन साहित्याचा वापर आणि ठेकेदार–विभागातील समन्वयाच्या अभावामुळे हे काम काही दिवस टिकणेसुद्धा कठीण आहे.
स्थानिकांनी सांगितले की,जनतेच्या पैशातून तयार होणारे हे काम इतक्या निकृष्ट पद्धतीने केल्याने गावकऱ्यांची दिशाभूल होते आणि शासकीय निधीचा अपव्यय होतोच यामध्ये भ्रष्टाचार देखील खूप मोठ्या प्रमाणात होत असून याचा पैसा गुत्तेदाराच्या खिशात जातो. यामुळे या बोगस कामाची या सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या बोगस रस्त्या कामाची तक्रार संबंधित बांधकाम विभागाकडे करण्यात येणार असून, रस्ता रोको व उपोषणाचा देखील विचारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.दरम्यान, हे प्रकरण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, स्थानिक पातळीवरही रस्त्याच्या बोगस कामाची चर्चा रंगली आहे.
आमदार आमदार धनंजय मुंडे बोगस रस्त्याच्या कामाची तक्रारीची दखल घेऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काळे यादी टाकणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.








