नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा मतदारांना कश्या धमकावतात व्हिडिओ पहा!
नगरध्यक्षपदाचे उमेदवारच धमकावत असल्याने राजकीय वातावरण तापले.

गेवराई : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक तारका जाहीर झाल्याने, काही दिवसांवर मतदान येऊन ठेपल्याने सर्वच पक्ष प्रचारासाठी सज्ज झाले असून मतदाराच्या गाठीभेटीवर भर देत आहेत.
गेवराई नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शहरामध्ये नागरिकांना मत मागताना धमकावत असल्याचा संशय असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. साधारणपणे कोणत्याही निवडणुकीत उमेदवार मतदारांपुढे हात जोडून मतदानाची विनंती करताना दिसतात.
विकास कामांचा,आडी अडचणीत सोबत असल्याची आठवण करून देत मतं मागत असतात परंतु या व्हिडिओमध्ये चक्क नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नागरिकांना धमकवतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
संबंधित उमेदवाराच्या बोलण्यात धमकावण्याचा सूर जाणवतो, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “मत मागायचे की धमकवायचे?” असा सवाल उपस्थित करत अनेकांनी अशा उमेदवारांना सत्ता दिली तर लोकशाही धोक्यात जाईल, अशीही टीका केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “लोकशाहीत मतदार हे सर्वोच्च असतात. त्यांना दबावाखाली ठेवून मत मागणे योग्य नाही. अशा उमेदवाराचा विचार मतदारांनी गंभीरपणे करावा.”
प्रसार माध्यमातून व्हिडिओ व्हायरल झाल्याने गेवराई येथील राजकीय वातावरण अधिकच तापल्याचे दिसत आहे;वायरल झालेल्या व्हिडिओ वरून निवडणूक आयोग काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








