ब्रेकिंग न्यूज

दैनिक पार्श्वभूमीचे संपादक श्री.गंमतभाऊ भंडारी व डॉ.जोगदंड यांची सदिच्छा भेट.

बीड शहरातील सामाजिक व राजकीय विषयावर सकारात्मक चर्चा.

बीड(प्रतिनिधी)बीड दैनिक पार्श्वभूमीचे संपादक व डॉक्टर जोगदंड यांची आज सदिच्छा भेट झाले असून सामाजिक शहरातील विविध विषयावर चर्चा झाली.         बीड शहरातील सध्याची राजकीय घडामोडी, समाजकारणातील बदलते प्रवाह तसेच विविध लोकहिताच्या प्रश्नांवर दिलखुलास चर्चा झाली. शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या योजनांची अंमलबजावणी, प्रशासनाचे सहकार्य, नागरिकांच्या अपेक्षा आणि भविष्यातील दिशा याबाबत सविस्तर विचारमंथन करण्यात आले.

गंमतभाऊ भंडारी यांचे अनुभवपूर्ण मार्गदर्शन आणि शहराच्या सर्वांगिण प्रगतीबाबत असलेली त्यांची स्पष्ट भूमिका खरोखरच प्रेरणादायी आहे. बीड शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय समतोल राखण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या श्री.गंमत भाऊ भंडारी यांच्यासोबत चर्चा होणे ही आनंदाची आणि उपयुक्त अशी संधी मिळाली.

भविष्यातही अशा सकारात्मक आणि विधायक चर्चांमधून शहराच्या विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमचे स्नेही श्री.आनंद वीर यांची देखील उपस्थिती होती. 

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button