बीड मध्ये वेश्या व्यवसायावर छापा.
पिडीत महिलेची सुटका,PSI पल्लवी जाधव व AHTU टीमची कारवाई.

बीड(प्रतिनिधी)बीड PSI पल्लवी जाधव यांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक नियुक्ती झाल्यापासून बीडमध्ये वेश्या व्यवसायावर करणाऱ्यावर धडक कारवाया केल्या जात आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) आणि शिवाजी नगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत धानोरा रोड परिसरातील एका घरावर छापा टाकून वेश्या व्यवसाय प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका पिडीत महिलेची सुटका करण्यात आली असून या अवैध धंदा चालविणाऱ्या ७० वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
PSI पल्लवी जाधव यांना मिळाली गुप्त माहिती :
१९ नोव्हेंबर २०२५ रोजी पथकाच्या PSI पल्लवी जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिवाजी नगर हद्दीत धानोरा रोडवर राहत्या घरात बाहेरील महिलांना बोलावून वेश्या व्यवसाय चालवला जात आहे. यानंतर ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
लेखी आदेशानंतर छापा :
वरिष्ठांनी पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांना AHTU पथकासोबत त्वरित छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार PI कस्तुरे, PSI पल्लवी जाधव, स्टाफ, पंच आणि डमी ग्राहकासह सापळ्याची पूर्वतयारी करून पथक सदर ठिकाणी पोहचले.
डमी ग्राहकाने दिला इशारा, छापा टाकताच सत्य उघड:
डमी ग्राहकाने घरातील महिलेशी संपर्क साधला असता, तिच्याकडून वेश्या गमनासाठी १,००० रुपयांची मागणी करण्यात आली. त्याने ठरलेली रक्कम दिल्यानंतर पथकाला संकेत देताच पोलिसांनी छापा मारला.
छाप्यात सदर महिला सीताबाई नारायण दहे (वय ७०, रा. धानोरा रोड, बीड) हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्या झडतीत डमी ग्राहकाने दिलेल्या ५०० रुपयांच्या २ नोटा पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या. तसेच खोलीतून २४ विना वापरलेले निरोधही जप्त करण्यात आले.
पिडीत महिलेची सुटका; आर्थिक फायद्यासाठी शोषणाचा आरोप :
ठिकाणी मिळालेल्या पिडीत महिलेला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, सीताबाई दहे या महिलांना बोलावून घेऊन ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे पीडितेची सुटका करण्यात आली.
गुन्हा दाखल :
सदर प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ कलम ३, ४, ५, ६ आणि ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाईत PI उमाशंकर कस्तुरे,PSI पल्लवी जाधव,महिला हवालदार उषा चौरे, हेमा वाघमारे,पोलीस हवालदार प्रदीप येवले, अशोक शिंदे,शिपाई योगेश निर्धार,सर्व जण AHTU टीमने केली.








