ब्रेकिंग न्यूज

भाजप/एमआयएम कार्यकर्ते आमने सामने;जोरदार घोषणाबाजी पहा !

थंडीच्या कडाक्यात बीड नगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापमान.

बीड(प्रतिनिधी)बीड नगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता रंगात येऊ लागले असून वातावरणात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. 18 नोव्हेंबर रोजी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान नगरपालिका कार्यालयाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. सर्वच पक्षांचे उमेदवार व कार्यकर्ते छाननी प्रक्रियेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. योगेश क्षीरसागर हे छाननी स्थळाकडे जात असताना डॉ.योगेश क्षीरसागर यांना पाहताच अचानक एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रत्युत्तर घोषणाबाजी केली .यामुळे नगरपालिका परिसरात.काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घोषणाबाजीच्या या ‘सामन्या’मुळे परिसर राजकीय घोषणांनी दणाणून गेला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. रात्री आठ वाजेपर्यंत छान झाली सुरू होती यामुळे थंडीत देखील वातावरण गरम होते.बीड नगरपालिका निवडणूक अधिकच रंगतदार, तापलेली आणि चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button