जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांचा दोन गुंडांना दणका !
अवैध मटका जुगार चालक व एक धोकादायक गुंडावर MPDA;हर्सूल कारागृहात रवानगी.

बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी जिल्हयाची धुरा सांभाळल्या पासुन शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत त्यांना बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. विवेक जॉन्सन यांची खंबीर साथ लाभली आहे. बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे व गुन्हेगारीचे व वाळु माफीयांचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन MPDA व MCOCA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे. त्या अनुषघांने पोलीस अधीक्षकांच्या सुचनेवरुन प्रभारी अधिकारी 1. पो.नि. पो.स्टे. माजलगांव शहर यांनी दि. 21.10.2025 रोजी इसम नामे शाम आप्पाराव भालेकर वय 38 वर्षे रा. अशोक नगर माजलगांव व सपोनि चकलंबा यांनी दिनांक 10.11.2025 रोजी 2) इसम नामे गोपाल मधुकर उनवणे वय 24 वर्षे रा. चकलंबा ता. गेवराई जि. यांचे विरुध्द MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांना सादर केला होता.
सदर स्थानबध्द इसम क्रमांक 1 याचे विरुध्द पो.स्टे. माजलगांव शहर येथे कल्याण व मिलन मटका खेळणे व खेळवीणे 1 रुपयाचे 90 रुपये देण्याचे अमिष दाखवुन बेकायदेशीर रित्या मटका जुगार चालविणे व धमक्या देणे शिवीगाळ करणे अशा गंभीर स्वरुपाचे एकुण 05 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. सदर व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे या करीता त्याचेवर कलम 129 बीएनएसएस अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती तरी त्याचे वर्तणात सुधारना झाली नाही.
सदर स्थानबध्द इसम क्रमांक 2 याचे विरुध्द पो.स्टे. चकलंबा, गेवराई व शिवाजीनगर येथे खुनाचा प्रयत्न करणे, गैरकायदयाची मंडळी जमविणे, दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, शिवीगाळ करणे, खंडणीची मागणीक करणे या व अशा गंभीर स्वरुपाचे एकुण 04 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्यातील 02 गुन्हे न्याप्रविष्ठ व 02 गुन्हे तपासावर आहे. सदर व्यक्तीने आपले वर्तन सुधारावे या करीता त्याचेवर कलम 129 बीएनएसएस अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती तरी त्याचे वर्तणात सुधारना झाली नाही.
सदर प्रकरणात श्री. विवेक जॉन्सन जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक 17.11.2025 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने MPDA कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून सदर दोन्ही इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्मुल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध्द करणे बाबत आदेश पारीत केले होते. त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना संबधित पो. स्टे. प्रभारी अधिकारी व पो.नि. स्थागुशा बीड यांना दिल्या होत्या. सदर आदेशावरुन पो.नि. स्थागुशा श्री शिवाजी बंटेवाड व पो.नि. राहुल सर्युतह पो. स्टे. माजलगांव शहर यांनी संयुक्त रित्या ताबे पोलीस अंमलदार यांचे मार्फत गोपणीय माहीतीच्या आधारे सदर इसमांना अनु क्रमे दि. 17.11.2025 व 18.11.2025 रोजी ताब्यात घेऊन नमूद इसमांना हार्मुल कारगृह, छत्रपती संभाजीनगर येथे दि. 18.11.2025 रोजी हजर करुन स्थानबध्द केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षकनवनीत कॉवत (भापोसे), अपोअ अंबाजोगाई चेतना तिडके, सचिन पांडकर, अपोअ बीड, उविपोअ गेवराई अनिल कटके, उविपोअ माजलगांव शैलेश गायकवाड, पोनि स्थागुशा श्री. शिवाजी बंटेवाड, यांचे मागदर्शनाखाली पो.नि. राहुल सुर्यतळ, पोउपनि केरबा माखणे, माधव तोटेवाड, संतराम थापडे, राम भंडाणे, माधव बहीरवाळ, सचिन मस्के सर्व पो.स्टे. माजलगांव शहर तसेच सपोनि संदिप पाटील, पोअं/सोमनाथ कुलकर्णी, अमोल येळे, अरुण राउत, हनुमंत इंगोले, संदीप गायकवाड सर्व पो.स्टे. चकलंबा तसेच सपोउपनि अभिमन्यु औताडे, अंकुश वरपे, विकास राठोड, गोविंद राख, नितीन वडमारे, युनुस बागवान नेमणुक स्थागुशा बीड यांनी केलेली आहे. भविष्यातही वाळुचा चोरटा व्यापार करणारे, अवैध गुटका विक्री करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती व जातीय तथा धार्मीक तेढ निर्माण करणारे समाजकंठक यांचेवर व दादागिरी करणाऱ्या, खंडणी बहाद्दर धोकादायक गुंडावर, बेकायदेशीर जुगार व लॉटरी चालवणारे व्यक्तीवर जास्तीत जास्त MPDA व MCOCA कायदयाअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत (भापोसे) यांनी दिले आहेत.







