ब्रेकिंग न्यूज

धाकधूक वाढली ! बीड नगरपालिकेत अर्ज छाननीला सुरुवात;उमेदवारांची भरली जत्रा!

दुपारपर्यंत उमेदवारांची यादी फायनल होणार !

बीड नगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची आज (18 नोव्हेंबर) सकाळपासून छाननी प्रक्रिया सुरू झाली आहे. नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 17 नोव्हेंबर होता. अंतिम क्षणापर्यंत उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर धाव घेतल्याने या निवडणुकीला प्रचंड उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

   नगरसेवक पदासाठी तब्बल सुमारे 800 अर्ज दाखल झाले असून, नगराध्यक्ष पदासाठी 47 अर्ज नगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. या सर्व अर्जांची बारकाईने छाननी चालू असून प्रत्येक अर्जात कोणतीही त्रुटी, कागदपत्रांमध्ये कमतरता किंवा आक्षेप असल्यास त्याबाबत निर्णय आज घेतला जाणार आहे.

छाननी प्रक्रियेच्या दिवशी नगरपालिका आवारात उमेदवारांची, त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अर्ज बाद होणार का? कुठे कागदपत्रांमध्ये उणेपणा तर नाही ना? आक्षेप येणार का? याबाबत उमेदवारांमध्ये उत्सुकता आणि धाकधूक स्पष्ट जाणवत आहे.

गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनावश्यक परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण परिसरात सतर्कता वाढवण्यात आली असून छाननी प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन दक्ष आहे.

छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर होण्याची सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. आगामी काही तास बीडच्या स्थानिक राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button