ब्रेकिंग न्यूज

विष्णू भैया वाघमारे यांच्या हाती तुतारी !

राष्ट्रवादी(शरद पवार)गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी विष्णू वाघमारे अधिकृत उमेदवार.

बीड (प्रतिनिधी) – बीड नगरपालिका निवडणुकीचे राजकीय तापमान चांगलेच वाढले असताना शेवटच्या काही तासांत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी शेवटी नगराध्यक्ष पदासाठी विष्णू भैया वाघमारे यांची अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे.

गेल्या ३० वर्षांचा भक्कम राजकीय अनुभव आणि सातत्याने नगरसेवक म्हणून काम पाहिल्यामुळे वाघमारे यांच्या नावाला जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी मागणी होती. आज अखेर त्या चर्चेला शिक्कामोर्तब झाले.

दरम्यान, बीड नगरपालिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत असून विविध पक्षांच्या उमेदवारांना एबी फॉर्मसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक असतानाही विष्णू वाघमारे यांच्याच नावावर पक्षाने अंतिम मुहर लावली. बीड शहरातील विविध समाजघटकांसह आंबेडकरी समाजात या निर्णयाचे स्वागत होत असून उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आता वाघमारे यांच्या उमेदवारीमुळे स्पर्धा आणखी रंगतदार होणार असून आगामी राजकीय समीकरणांवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button