डाॅ.योगेश क्षीरसागर यांचा भाजपा प्रवेश.काय म्हणले डॉ.क्षीरसागर पहा.
बीडच्या राजकारणात भूकंप,काय म्हणाले डॉ.योगेश क्षीरसागर पहा..

बीड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची घडामोड अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत डाॅ. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आपल्या विधान अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे दिला होता. यामध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्यामागील कारणे सांगितले.अखेर भाजपात अधिकृत प्रवेश केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
क्षीरसागर यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा राजकीय धक्का बसला असून बीड जिल्ह्यातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपरिषद निवडणुका समोर असताना झालेल्या या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असून आगामी राजकारणात नवीन समीकरणे तयार होणार यात शंका नाही.
भाजप प्रवेशाने डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, बीड जिल्ह्यातील पुढील राजकीय घडामोडी काय वळण घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









