ब्रेकिंग न्यूज ! डॉ.योगेश क्षीरसागरांचा राष्ट्रवादी बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
राष्ट्रवादी(अजित पवार गट) पक्षाला धक्का.विकास हाच धर्म, विकास हीच जात"डॉ.क्षीरसागर.


“विकास हाच धर्म, विकास हीच जात” म्हणत पदाचा राजीनामा; स्थानिक स्तरावरील डावलण्याचा आरोप
बीड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी कार्यरत असलेले डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रियेत जाणूनबुजून डावलले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी आपल्या राजीनाम्यात केला आहे.
डॉ. क्षीरसागर यांनी म्हटले आहे की, वेळोवेळी पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार करूनही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. अशा परिस्थितीत कार्य करण्यास अडचण येत असल्याने ते पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“पक्षाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व वरिष्ठ नेत्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. मी माझ्या पदावरून पक्षाची विचारधारा तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु विकासासाठी काम करताना डावलल्या जाण्याची वेदना सहन करणे कठीण झाले,” असे त्यांनी नमूद केले असून, “विकास हाच धर्म, विकास हीच जात” या घोषवाक्यासह त्यांनी सर्व पदांचा राजीनामा जाहीर केला.
डॉ. क्षीरसागर यांच्या या निर्णयामुळे बीडच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.










