
बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यापासून दिवसा घरफोडी चोरी होण्याच्या प्रकारात वाढ होत असल्याने दिसत आहे.
दिनांक 12 आणि 14 नोव्हेंबर रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या दिवसा घरफोडीच्या फिर्यादी दाखल झाल्या होत्या. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आज 15/11/2025 रोजी दोन्ही घरफोडी प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपीची ओळख : अमोल गणेश रांजवण (वय 35, रा. माळीवाडा, बीड) व आकाश भोसले यांनी दोघांनी चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळताच अमोल रांजवण आरोपी हा मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटाटकर यांच्या पथकाने सदर ठिकाणी धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
अटक केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने दोन्ही दिवसा घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच त्याचा साथीदार आकाश भोसलेंचेही नाव सांगितले.
सोबतच एकूण 96,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा 1,46,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या कारवाईत पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडुरकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बेंडवाड, उपनिरीक्षक श्रीराम खटाटकर तसेच पोलीस कर्मचारी राहुल शिंदे, अश्फाक सय्यद,सोमनाथ गायकवाड, मनोज पराजने यांच्या पथकाने महत्वपूर्ण भूमिका बजावली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे दोन घरफोडी प्रकरणांची उकल होऊन नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.





