आ.संदीप क्षीरसागर यांच्या कॉर्नर बैठकीत”हिंदू मुस्लिम एकीचे दर्शन”
नगरसेवका सह नगराध्यक्ष आमचाच;काय म्हणाले आ.क्षीरसागर पहा !

बीड (प्रतिनिधी): बीड नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील सर्वच प्रभागातील इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेऊन जवळपास उमेदवाराची यादी निश्चित झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे उमेदवार आपल्या प्रभागात प्रचाराला लागले असून गाठीभेटीवर भर देत आहेत.
बार्शी नाका परिसरात अफसर शेख यांच्या उमेदवारी बाबत झालेल्या कॉर्नर बैठकीला आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम सह इतर मान्यवर उपस्थित राहिल्याने या बैठकीचे सभेत रूपांतर झाले.
या बैठकीला तरुणासह,महिला व वृद्धाची लक्षणीय उपस्थिती होती. या सभेची खास बाब म्हणजे उपस्थित नागरिकांनी दर्शवलेले हिंदू-मुस्लिम बांधिलकीचे ऐक्य.”जय भवानी जय शिवाजी ते सलाम वालेकुम पर्यंतचा घोष एकाच मंचावर घुमल्याने वातावरणात एकात्मतेचा संदेश पसरला”. संदीप क्षीरसागर आपल्या भाषणात म्हणाले की, विरोधकांचे उमेदवार अंतिम झालेले नाहीत,अजूनही गोंधळ सुरू आहे. पण आमचे मात्र एकूण ५२ उमेदवार पूर्णतः तयार आहेत. नवगण राजुरी माझ्यासाठी बालेकिल्ला, गड आहे तसाच मोमीनपुरा देखील माझ्यासाठी गड आहे असे म्हणाल्याने उपस्थिता मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.तसेच ठाम भूमिका, स्पष्ट धोरण आणि जनता आमच्यासोबत आहे. क्षीरसागर यांच्या या विधानामुळे निवडणूक वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी ठरत असून नगरसेवकांसह नगराध्यक्ष देखील आमचाच असेल असा विश्वास आ. संदीप क्षीरसागर यांनी दिला.







