एक कोटीच्या कारसह चार ट्रॅक्टर भरून मशिनरी पोलिसांनी केल्या जप्त.
महागडी कार व मशिनरी कुटेची ? पोलिसांकडून तपास सुरू

आरटीओ कार्यालयाला गाडीची ओळख पटवण्याचे दिले पोलिसांनी पत्र ; 95 लाखांची ऑडी गाडी कोणाची ?
बीड(प्रतिनिधी)बीड एमआयडीसी भागातील नवीन मोंढा परिसरात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या गाळ्यात एका ऑडी कंपनीच्या महागड्या गाडीसह अन्य धान्य व डाळ फिल्टर करण्याच्या महागड्या यंत्रसामग्री बेवारस स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. तब्बल 95 लाखाची कार व लाखोंची यंत्रसामग्री कोणाची याची चर्चा शहरात जोरदार सुरू होती.
विशेष म्हणजे देशमाने नामक गाळा मालकालाही या साहित्याची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून हे गाळे बंद स्थितीत असल्याने या ठिकाणी अज्ञात लोकांनी यंत्रसामग्री व ऑडी गाडी ठेवली गाळा साफ करण्याच्या उद्देशाने देशमाने यांनी दिनांक सात नोव्हेंबर रोजी गाळा उघडल्यास आत मध्ये असलेले साहित्य पाहून तात्काळ त्यांनी ग्रामीण पोलिसांची संपर्क साधला. सदरील ऑडी गाडीवर नंबर नसल्याने गाडीची ओळख पटवण्यास विलंब होत असून ग्रामीण पोलिसांनी गाडीची ओळख पटवण्यासाठी आरटीओ कार्यालयास पत्र दिले असून गाडीच्या चेसिस नंबर वरून मूळ मालकाची ओळख पटणार आहे. यासह हे शेतकरी साहित्य कोणाचे याबाबत पोलिसाकडे कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसून नेमकी गाडी व यंत्रसामग्री कोणी व कधी ठेवली याबाबत अद्यापही काहीच स्पष्ट होत नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाड्यांमध्ये सापडलेले ऑडी कंपनीची गाडी व शेतकरी यंत्र सामग्री यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नवीन मोंढा कृषी उत्पन्न बाजार समिती येथील गळ्यामध्ये देशमाने यांनी दोन गाळे करारानुसार घेतले होते. मात्र अडगळीत असणारे या गाळ्याकडे मागील अनेक दिवसांपसून देशमाने यांनी लक्ष दिले नसल्याने या गाळ्यांचा वापर अज्ञात इसमाने स्वतःच्या फायद्यासाठी तब्बल 95 लाख रुपये किमतीच्या ऑडी गाडी लपवण्यासाठी घेतला. तसेच या ठिकाणी धान्य स्वच्छ करण्याच्या मशिनरी मोठ्या प्रमाणात असल्याने हे साहित्य कोणाचे याबाबत अनेक चर्चा रंगून येत आहे. एमआयडीसी परिसरात ज्ञानराधा व तिरुमला इंडस्ट्रीज यांचे कार्यालय आहे विशेष म्हणजे अर्चना कुटे व सुरेश कुटे यांना महागड्या गाड्या वापरण्याचा छंद होता. कुटे आर्थिक फसवणूक प्रकरणात जेलची हवा खात आहे ही गाडी त्यांच्याच लोकांनी या ठिकाणी लपवली असल्याची चर्चा आहे. मात्र एवढे दिवस झाल्यानंतरही ही गाडी येथून का काढण्यात आली नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.
जर गाळा मालकाशी या सर्व गोष्टींचा संबंध नसेल तर एवढी मोठी डेरिंग सदरील व्यक्ती का करतील ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
सर्वच गोष्टी संशयित :
गेल्या अनेक महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीमधील देशमाने यांचे गाळे बंद स्थितीत होते. याची माहिती ऑडी गाडी व यंत्र सामग्री ठेवणाऱ्या व्यक्तीला होती का ? लॉक तोडून हे साहित्य ठेवण्यात आले गाळे उघडल्यानंतर सदरील माहिती देशमाने यांना मिळाली. ग्रामीण पोलिसांची संपर्क साधत त्यांनीच या गोष्टीची माहिती दिली, मात्र एवढे दिवस गाळे उघडण्याचे देशमाने यांनी का टाळले, याशिवाय गेल्या अनेक दिवसांपसून ऑडी गाडी व यंत्रसामग्री गळ्यामध्ये ठेवणारे विकीही इकडे फेकले नाही. ऑडी गाडी कोणाची याची चर्चा होत असताना एवढी महागडी गाडी या परिसरात फक्त सुरेश कुटे अथवा अर्चनाकुटे याच वापरत असल्याची चर्चा आहे. काही कालावधीसाठी जर ऑडी गाडी ठेवली असती तर या ठिकाणी यंत्रसामग्री कोणी ठेवली ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून सर्वच बाबी संशयाच्या भवऱ्यात सापडल्या आहेत.
ग्रामीण पोलिसांनी आरटीओ कार्यालयाला चेसिस नंबर वरून मालक पटवण्याचे दिले पत्र :
बीड ग्रामीण पोलिसांनी ऑडी गाडी व यंत्रसामग्री जप्त करत थेट पोलीस ठाण्यात सर्व साहित्य आणले आहे. ऑडी गाडीचा चेसिस नंबर बोनेट मध्ये असतो मात्र या गाडीची चावी नसल्याने सदरील गाडी उघडण्यासाठी आरटीओ कार्यालयाला ग्रामीण पोलिसांनी पत्र दिले आहे. आरटीओ कार्यालय चेसिस नंबर वरून मूळ मालकाचा शोध घेतील, ही गाडी जर कुटे यांची मालकीची असेल तर ती जप्त करण्यात येईल परंतु या गाडीचा वापर देशात अथवा राज्यात काही घातपातासाठी केला आहे का व तो लपवण्यासाठी ही ऑडी गाडी या ठिकाणी लावण्यात आली याचाही तपास होणे आवश्यक आहे. आरटीओ कार्यालयाने तात्काळ चेसिस नंबर वरून गाडी मालक कोण याचा तपास करावा. गेल्या सहा दिवसापासून याची चर्चा होत असून तब्बल 95 लाख रुपये किमतीची ऑडी गाडी व लाखोंची यंत्रसामग्री कोणाची ?
सीआयडी कडे तपासवर्ग होण्याची शक्यता :
ऑडी गाडी प्रकरण एकीकडे पोलिसांसाठी तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून सदर गाडीचा मालक व ही गाडी या ठिकाणी कोणी लावली या गाडीचा वापर कुठे गुन्ह्यात वापरला गेला आहे का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे या ऑडी गाडीचा संबंध सुरेश कुटे यांच्याशी आल्यास हा तपास सीआयडी कडे वर्ग होण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे या ऑडी गाडी प्रमाणे सुरेश कुटे यांच्या इतर महागड्या गाड्या व साहित्य इतर ठिकाणी ठेवले असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. ऑडी गाडीचा मालक व लाखोंची यंत्रसामग्री कोणाची व या गाळ्यात कोणी ठेवली याचा तात्काळ तपास होत जनतेसमोर सर्व माहिती पुढे येणे आवश्यक झाले आहे. शिकार व यंत्रसामग्री कुटेची असेल तर आणखी ही धक्कादायक बाब असून आणखी महागड्या कार कोठे लपवून ठेवल्या का याचा देखील तपास होणे आवश्यक आहे.









