बीड जिल्हाब्रेकिंग न्यूज
साक्षी रवींद्रकुमार परदेशी अंबाजोगाई चे नेत्रदीपक भरतनाट्यम.
अंबाजोगाई आणि राज्या बाहेरील श्रोत्यांची मने जिंकली.

अभय जोशी :—
अंबाजोगाई येथील साक्षी रवींद्रकुमार परदेशी यांनी योगेश्वरी मंदिर परिसरात आरंगेतरम कार्यक्रमांतर्गत भरतनाट्यम अप्रतिम नृत्याविष्कार सादर करून हि सेवा गुरू पंचमनिषद चे शरदापुत्र डॉ विनोद निकम,दिल्ली हुन आलेल्या गुरू जयालक्ष्मी यांच्या समोर सादर केली.या वेळी पंचमनिषद ची सर्वच गुरू शिष्य विद्यार्थी उपस्थित होते. वाद्यवृंद,हि गायक या सर्वांची अप्रतिम साथसंगत केली. गुरू जयालक्ष्मी या दिल्ली येथे नृत्य,संगीत विभाग प्रमुख असून वयाच्या ५ व्या वर्षा पासून भरतनाट्यम अवगत केले आहे. या शिवाय कपिलधार येथील विरुपाक्ष स्वामी ही उपस्थित होते. अंबाजोगाई येथील सर्वच संगीत मान्यवर उपस्थित होते,मोठया प्रमाणात महिला,रसिक श्रोते आले होते सर्वांचीच मोठया प्रमाणात दाद मिळाली. सूत्र संचलन पत्रकार परमेश्वर गित्ते आणि रचना परदेशी यांनी अतिशय बहारदार केले.







