तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद !
तांदूळ रेशनचा,काळया बाजारात जाणार होता ? तांदळाचा मालक कोण ? प्रशासन,पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह !

बीड (प्रतिनिधी)धुळे-सोलापूर महामार्गावरील पाली जवळील मंजरी फाट्यावर १२ नोव्हेंबर रोजी दुपारी तांदूळ घेऊन जाणारा ट्रक (क्र. MH23BF 9005) पलटी झाला.
ट्रकमधील तांदूळ रस्त्यावर विखुरल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदीराज यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. अपघात झाल्यापासून ते आज दिनांक 13 नोव्हेंबर दुपारपर्यंत बीड ग्रामीण पोलिसांनी कर्मचाऱ्यांनी रात्रभर तांदळाला खडा पहारा दिला.
हा तांदूळ नेमका कोणाचा?
अपघात झाल्यानंतर प्रशासनासमोर अनेक प्रश्न : हा तांदूळ कोणाचा? बीडमध्ये कुठे विक्री होणार होता? या तांदळाचा मालक कोण? अद्याप पर्यंत मालक समोर न येण्याचे कारण काय? अपघात झाला म्हणून तांदळाचा काळाबाजार गुन्हा पडला आहे का? असे अनेक प्रश्न पोलीस व पुरवठा विभागाला पडले आहेत.
हा तांदूळ शासनाच्या पुरवठा विभागाचा होता की खासगी व्यापाऱ्याचा, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी प्राथमिक तपासात तांदूळाचा साठा शासन पुरवठ्याचा असण्याची शक्यता नाकारलेली नाही.या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत असून, ट्रक कोणत्या ठिकाणाहून निघाला आणि बीडमध्ये नेमका कोणाकडे तांदूळ पोहोचवायचा होता, याचा शोध सुरु आहे.
बीड पुरवठा विभागाला पोलिसांचे पत्र :
अपघातग्रस्त ट्रक मधील काही तांदळाच्या पोत्यावर शासनात चे शिक्के असून ते होते सीलबंद आहेत त्यामुळे हा तांदूळ रेशन दुकान चा आहे का असा देखील संशय व्यक्त केला जात आहे यामुळे ग्रामीण पोलीस ठाण्याने पुरवठा विभागाला लेखी पत्र देऊन या तांदळाची पावती, परवाना व नोंद तपासण्यासाठी मागवली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचालक आणि मालक दोघेही अपघातानंतर बीडमध्ये तांदूळ पोहोचवण्याबाबत टाळाटाळ करत आहेत, त्यामुळे हा तांदूळ चोरीचा अथवा काळाबाजारासाठी ठेवलेला तर नव्हता ना, अशी शंका उपस्थित झाली आहे.
पंचनाम्याची प्रक्रिया आज पूर्ण होणार !
अपघातानंतर निरीक्षक अशोक मुदीराज यांनी घटनास्थळीच तांदूळ दुसऱ्या वाहनात भरून जप्त केला.या तांदळाचा पंचनामा आज तहसील कार्यालय व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पंचनाम्यानंतरच हा तांदूळ शासन पुरवठा विभागाचा की खासगी मालाचा, हे स्पष्ट होईल.
काळाबाजाराचा संशय :
स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबद्दल मोठी चर्चा सुरु आहे.
तांदूळ काळाबाजारासाठी वाहतूक केली जात होती, अशीही शंका व्यक्त होत आहे.
बीड ग्रामीण पोलीस आणि पुरवठा विभाग दोन्हींकडून या ट्रक मधील तांदळाचा तपास सुरु असून, या अपघाता मागील व तांदळा बाबत सत्य लवकरच बाहेर येईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.









