डॉ.योगेश व सारिका क्षीरसागर परळीत दाखल.
भाजप राष्ट्रवादी युती होणार ? पंकजा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क.

बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्धार केल्याने राजकीय समीकरणात चांगलाच पेच निर्माण झाला आहे.
दिनांक ११ नोव्हेंबर रोजी बीड शहरात झालेल्या बैठकीत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत बीड नगरपालिकेतील नगरसेवक व नगरअध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारा सोबत चर्चा करून स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज डॉ. योगेश क्षीरसागर व सारिका क्षीरसागर हे पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी परळीत दाखल झाले आहेत. बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली किंवा या भेटीमागचे राजकीय गणित काय आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसून, थोड्याच वेळात सविस्तर वृत्त देण्यात येणार आहे.









