
बीड (प्रतिनिधी) दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी अ 8 वाजता बीड शहरातील बार्शी रोडवरील शिवराज चौक, शिवाजीनगर भागामध्ये असलेल्या हॉटेल शंतनू सुखसागर बिअर अँड रेड वाईन शॉपच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली.
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समजते.
शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर हे हॉटेल असल्याने घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अग्निशामक दलाला माहिती दिल्यानंतर तत्काळ अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती.
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हॉटेलमधील साहित्य व सामान जळाल्यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने ही आग विझवणे शक्य नव्हते परंतु वेळीच अग्निशामक दल पोहोचल्याने आग शेजारील दुकानांपर्यंत पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
ही आग अग्निशमन दलाचे अधिकारी किशोर जाधव. , रमेश आदमाने सिनिअर फायरमन, अनिकेत ओव्हाळ वाहन चालक हे बार्शीनगर शिवाजीनगर घटनास्थळी पोहचून पूर्ण आग विझवली.











