चारचाकी गेली नालीसाठी खोदलेल्या खड्ड्यात !
इस्कॉन कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथानपणा.

बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील बार्शी रोडवर नाली व सिमेंट रस्ते काम सुरू आहेत.याच रस्त्यांच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभाग व कॉन्ट्रॅक्टरचा गलथानपणा उघडकीस आला आहे. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या कामामुळे शहरात वाहतूक कोंडी तर वाढलीच आहे, पण आता अपघाताचा धोका सुद्धा वाढताना दिसत आहे.
नाली,रस्त्याचे काम सुरू असताना देखील संबंधित कंट्रक्शन वाल्याने काहीच उपाययोजना न केल्याने चारचाकी थेट नालीसाठी खोदलेल्या खड्ड्यात गेली.
दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी MH 23 BC 5822 ही चारचाकी कारमधून महिलेला प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना हा अपघात झाला.
बार्शी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ खोदलेल्या हा अपघात झाला, सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. या अपघातात वाहनातील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून मोठा अनर्थ टळला तरी चारचाकीचे नुकसान झाले आहे.
इस्कॉन कंपनी ,कॉन्ट्रॅक्टर व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे खोदकाम करताना कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना न केल्यामुळेच हा अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. काम सुरू असताना परिसरात बॅरिकेड लावणे, ‘काम सुरू आहे’ अशा सूचना फलक लावणे, तसेच रात्रीच्या वेळेस परावर्तित चिन्हे (reflective signs) लावणे आवश्यक असते. परंतु अशा कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.
संबंधित कॉन्ट्रॅक्टर व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या गलथान कारभारामुळे एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का? जीवितहित झाल्यास जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल होणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











