शिवसंग्रामचे सातीराम ढोले प्रभाग क्रमांक 26 मधून निवडणुकीच्या मैदानात !
जनतेचा नेता,हक्काचा माणूस म्हणून सातीराम ढोले यांची ओळख.

बीड(प्रतिनिधी )बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवसंग्रामचे शहर उपाध्यक्ष आणि समाजसेवक सातीराम अण्णा ढोले यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. समाजसेवा, नेतृत्व आणि दातृत्वाचा सुंदर संगम असलेल्या ढोले यांनी आपल्या कार्यातून जनतेच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
स्वर्गीय विनायकराव मेटे यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून गेल्या आठ वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असलेल्या ढोले यांनी एम.एस. कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात विकासकामांची ओळख निर्माण केली आहे. कोणताही राजकीय वारसा नसतानाही फक्त परिश्रम, जनसेवा आणि गोरगरिबांच्या मदतीच्या जोरावर त्यांनी प्रभागातील जनतेच्या मनात ठसा उमटवला आहे.
समाजसेवेचा ध्यास, नागरिकांचा विश्वास :
गोरगरिब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, रुग्णांना औषधोपचारासाठी सहाय्य, तरुणांना उद्योजकतेकडे वळण्यासाठी प्रेरणा देणे, तसेच परिसरातील विविध सामाजिक प्रश्नांवर उपाययोजना करणे — हे त्यांच्या कार्याचे मुख्य वैशिष्ट्य राहिले आहे.
पर्यावरण संवर्धन, रक्तदान, वृक्षारोपण, जलसंधारण आणि अन्नदान अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ढोले नेहमीच पुढाकार घेतात. “स्वतःसाठी नव्हे, समाजासाठी काहीतरी करायचं” ही त्यांची विचारसरणी नागरिकांना भावते.
जनतेचा नेता,हक्काचा माणूस :
सातीराम ढोले यांच्या साधेपणात आणि आपुलकीच्या स्वभावात एक “आपलेपणा” जाणवतो. संकटाच्या वेळी “माझा माणूस आहे” अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच त्यांच्या नगरसेवक पदाच्या चर्चेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
नव्या नेतृत्वाची झलक :
बीड नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 26 मधून सातीराम ढोले यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित झाले असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
त्यांचे समाजाभिमुख कार्य, नेतृत्वगुण आणि सर्वसमावेशक दृष्टी यामुळे ते जनतेच्या मनातील उमेदवार ठरत आहेत.
“सातीराम ढोले हे फक्त नाव नाही, तर बीडच्या सामाजिक जागृतीचा ध्यास आहे.”
अशीच समाजसेवेची परंपरा जोपासणारी तरुणाई बार्शी नाका प्रभाग क्रमांक 26 मधील विकासाचा मजबूत पाया ठरेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.











