लाच घेताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात.
वाळू प्रकरणातील आरोपीला अटक न करण्यासाठी मागितली लाच.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात लाचखोरीची प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. बहुतांश शासकीय निमशासकीय कार्यालयात टेबला खालून पैसे लाच दिल्याशिवाय काम होत नसल्याचे चित्र सध्या बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
बीड जिल्ह्यात वाळू उपसा व वाहतुकीवर बंदी असताना काही पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार करत वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.
गेवराई पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला अवैध वाळू वाहतुकीच्या प्रकरणातील आरोपीला मदत करण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई गेवराई शहरात शनिवारी रात्री सात वाजता करण्यात आली. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.
विजय दिगंबर आघाव असे लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. शनिवारी सकाळीच पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारे एक वाहन पकडले होते. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी आणि तपासकामात त्याला मदत करण्यासाठी हवालदार विजय आघाव याने लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने सापळा रचून गेवराई शहरात पावणे सात वाजता हवालदार आघाव याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्ठमपल्ले यांच्यासह पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
ही कारवाई DYSP सोपान चिट्टमपले, पो.ह.प्रदीप सुरवसे, पो.ह.अविनाश गवळी, पो.हे.अमोल खरसाडे, पो.ह.अंबादास पुरी यांनी केली.









