ब्रेकिंग न्यूज
बीड नगरपालिका कर्मचारी धांडेंची आत्महत्या !
नगरपालिकेतील टेरेसवरील सिडीला घेतला गळफास.

बीड(प्रतिनिधी)बीड नगर पालिकेच्या वसुली विभागात कार्यरत असलेले कर्मचारी अविनाश धांडे (वय ४४), रा. बीड यांनी नगर पालिकेच्याच टेरेसवर असलेल्या लोखंडी सीडीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
अविनाश धांडे यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण मात्र समजू शकले नाही. घटनेची माहिती कळताच बीड शहर पोलिसांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. टेरेसच्या वर जाण्यासाठी लोखंडी सीडी लावण्यात आलेली आहे.त्याच सीडीला दोरीने गळफास लावून धांडे यांनी आत्महत्या केली. अविनाश धांडे हे अत्यंत मनमिळावू व शांत स्वभावाचे असल्याने ते सर्वत्र परिचित होते. धांडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकते नाही.










