चोरटे मोबाईल कसे चोरतात पहा !
परळीत मोबाईल चोरांचा धुमाकूळ.पोलिसांनी चोरट्याचा बंदोबस्त करावा.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात बसस्थानक, बाजारपेठ, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल व मौल्यवान वस्तू चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे पोलिसांचा धाक उरला नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती परळी वैजनाथ येथील कर्मचारी बाळासाहेब कांदे यांचा मोबाईल सोमवारी (दि. ३ नोव्हेंबर २०२५) रोजी मोंढा मार्केट यार्डमधील हनुमान मंदिरासमोर भाजीपाला खरेदी करत असताना एका चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार गर्दीचा फायदा घेत केला असून, मोबाईल काढून नेणारा चोरटा सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत असल्याची माहिती मिळाली आहे.
चोरट्याची ओळख कोणाला पटल्यास तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा परळी पोलिसात याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, परळी शहरात अशा चोरीच्या घटना वाढत असताना पोलिसांनी गस्त वाढवून तातडीने कारवाई करावी, चोरट्यावर पोलिसांचा धाक न राहिल्यानेच चोरीच्या घटनेत वाढ होत असून तत्काळ परळी पोलिसांनी चोरांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी मागणी नागरिकांकडून होत आहे




