
बीड – (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहीर होतात बीड मधील शिवाजीनगर,पेठ बीड,ग्रामीण पोलीस ठाणे व गेवराई पोलिस ठाणे प्रमुखाच्या बदल्या करण्यात आल्या.
नव्या आदेशानुसार खालीलप्रमाणे पदस्थापना करण्यात आली आहे:
शिवाजीनगर पोलीस ठाणे – प्रवीणकुमार बांगर
गेवराई पोलीस ठाणे – किशोर पवार
बीड ग्रामीण पोलीस ठाणे – अशोक मुदिराज
पेठ बीड पोलीस ठाणे – मारुती खेडकर
बीड शहर कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाने हा बदल्या निर्णय घेतल्याचे समजते.
लवकरच नवीन पदस्थापित अधिकारी आपापल्या कार्यभाराची धुरा स्वीकारतील.




