
बीड दि.२ (प्रतिनिधी) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात सायंकाळी चार वाजता राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेला बोलावले असून, महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील नगरपालिका निवडणुकींचा पहिला टप्पा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.आज नगर पालिका निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होऊ शकते. राज्यातील विरोधी पक्षांनी दुबारा मतदारावर अक्षेप नोंदवला असून त्यावर देखील निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.मतदार यादीतील चुका, दुबार मतदार नोंदणी असलेल्या यादीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार यावर राजकीय पक्षाची भूमिका काय असेल हे आज स्पष्ट होईल
यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि जानेवारीत महानगरपालिका निवडणुका अशा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम राबवला जाणार आहे. प्रशासनाने तयारीला गती दिली असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडूनही हालचाली वाढल्या आहेत.
निवडणूक आयोगाने तीन टप्प्यात निवडणुका घेण्याचे आयोजन केले असून जर आचारसंहिता आज लागू झाली, तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगर पालिकांच्या मतदानाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
				
					


