
अंबाजोगाई मध्ये प्रथमच ऐतिहासिक “स्वराभिषेक” संपन्न झाला. दि ०२ ऑक्टोबर २५ रोजी कार्तिक एकादशी निमित्ताने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सलग १० तास विठ्ठल चरणी अभंग,गवळण,भावगीते, देवीचे गीते ,मराठी,हिंदी गीतांचा स्वराभिषेक अर्पण करण्यात आला. नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) ,वसुंधरा प्रतिष्ठान, कलाकार कट्टा अंबाजोगाई यांच्या माध्यमातून हा ऐतिहासिक स्वराभिषेक झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन अक्षय भैय्या मुंदडा आणि पंडित पांडुरंग देशपांडे, सौ राणी वडगावकर,जयंत कुलकर्णी, अंबादास चिक्षे,पंडीत जोगदंड, महादेव मस्के बळीराम चोपणे, सौ मंजुषा देशपांडे, प्रकाश बोरगावकर, शशिकांत गायकवाड,आदींच्या उपस्थितीत झाले. अंबाजोगाई मधील सर्वच गायक,गायिका,हौशी गायक ,विविध भजनी मंडळे, यांनी लाईव्ह,कराओके प्रकारातून अप्रतिम सादरीकरण केले. यावेळी तुकाराम सुवर्णकार, असाराम जोशी,प्रदीप चोपणे,सुभाष शेप पत्रकार राहुल देशपांडे, डॉ अतुल देशपांडे, डॉ संदीप जैन,डॉ देवराव चामनर, श्रीधर देशपांडे, नारायण चाटे,संजय पाटील,अभय जोशी ,दिपक बिडवेआदींचा सहभाग होता.




