बीड बसस्थानकाला उद्घाटना आधीच लागली गळती !
१३ कोटींचे काम गेले पाण्यात? डॉ.ढवळे यांची संतप्त प्रतिक्रिया.

बीड(प्रतिनिधी)दि. ०१ बीड बसस्थानकासाठी तब्बल १३ कोटी रुपये खर्चून बीड शहरात उभारण्यात आले आहे.नवीन मध्यवर्ती बसस्थानक उद्घाटनाआधीच गळतीला लागले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात छपरातून अनेक ठिकाणी पाणी गळू लागल्याने प्रवासी त्रस्त झाले. पाण्याच्या गळतीसह इतर सुविधेबाबद गुत्तेदारावर रोष व्यत होत असून,गुत्तेदाराच्या गलथानपणा उघड झाला आहे.
बसस्थानकात उभे राहण्यासाठी छत्रीची गरज भासत आहे,असा प्रवाशांचा संताप उसळला आहे.
अपूर्ण काम, स्वच्छतेचा अभाव
जून २०२५ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही
▪️ स्वच्छतेचा अभाव▪️ शौचालय बंद▪️ पथदिवे बंद – प्रकाशव्यवस्था निकृष्ट▪️ रात्री अनुचित हालचालींची नोंद असे गंभीर प्रश्न कायम आहेत.
गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे पत्रे उघडी पडून छप्पर तुटक अवस्थेत दिसत असल्याचे तक्रारींमध्ये नमूद आहे.
अजितदादा पवार यांनी बीड दौऱ्यात “निकृष्ट काम करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट” करण्याची सूचना दिली होती.मात्र आता उद्घाटनाआधीच गळती, त्यामुळेपालकमंत्र्यांनी तातडीने कडक कारवाई करत त्या गुत्तेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे अशी ढवळे यांची मागणी आहे.
“दोन वेळा भूमिपूजन करणारे आता गप्प!”
बसस्थानकासाठी निधी आणल्याचे श्रेय घेण्यासाठी दोन वेळा भूमिपूजन केलेले नेते आज मात्र मूक-बधिर झाल्याचा आरोप ढवळे यांनी केला आहे.
निष्कर्ष :
१३ कोटी खर्चूनही कामाचा दर्जा शून्य,प्रवाशांच्या सुरक्षेला आणि सुविधांना काळजी नाही,अशी संतप्त भावना नागरिकांत वाढत आहे.बसस्थानकाचे उद्घाटन होण्यापूर्वीच गळतीने सरकार व अधिकाऱ्यांची नाकेबंदी उघड झाली आहे.
बीड बसस्थानकाला गळती लागल्याने बस स्थानकात देखील छत्री घेऊन उभा राहावे लागत असल्याने पहिलेच बस स्थानक चांगले होते अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या.



