ब्रेकिंग न्यूज

हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमुळे डॉ.संपदा मुंडे मृत्यू प्रकरणाची दिशा बदलली.

डॉ.संपदा मुंडेना न्याय देण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची राज्यातून मागणी.

बीड / फलटण (प्रतिनिधी): राज्याला हादरवून सोडणाऱ्या डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाला हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमुळे नवे वळण मिळाले आहे. या फुटेजमधून डॉ. मुंडे यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून स्वतःच्या रूममध्ये गेल्याचे स्पष्ट दिसत असून, यामागे घातपात नसल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले आहे. मात्र, आत्महत्येचे कारण म्हणून सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यांवरील आरोपांमुळे प्रकरण अजूनही गंभीर व संवेदनशील स्वरूपाचे ठरले आहे.

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांना बनावट फिटनेस व पोस्टमार्टम अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला जात असल्याची त्यांनी तक्रार दिली होती. तरीदेखील त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ देखील दोषी असल्याचे दिसत आहे.

सुसाईड नोटमध्ये डॉ. मुंडे यांनी पीएसआय बदने आणि प्रशांत बनकर यांनी मानसिक व शारीरिक छळ करत अत्याचार केल्याने आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. या आत्महत्येच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून संतापाची लाट उसळली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई आणि फाशीची शिक्षा देण्याची मागणी जनतेकडून होत आहे. पीएसआय बदने व प्रशांत बनकर हे दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांचे मोबाईल मधील डाटा पोलीस तपासत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, तांत्रिक तपास व सुसाईड नोटच्या फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे पुढील कारवाई सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावी, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button