धावत्या ट्रॅव्हल्सवर चढून चोरट्याने बॅगा चोरल्या.
पारगाव टोल नाक्या जवळील घटना,१२ बॅग्स लंपास.

पारगाव टोल नाक्यावर अज्ञात चोरट्यांचा धाडसी हात – राजस्थानहून परतणाऱ्या भाविकांच्या बॅगा लंपास.
बीड :आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास देवदर्शन करून धाराशिव वरून बीडकडे येत असलेल्या धावत्या मिनी ट्रॅव्हलवर अज्ञात चोरट्यांनी चढून धाडसी चोरी केली. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमधील काही लोक देवदर्शनासाठी राजस्थानकडे गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान पारगाव टोल नाक्याजवळ त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलवर अज्ञात चोर चढले आणि प्रवाशांच्या 12 ते 13 बॅगा लंपास केल्या ही बाब प्रवाशाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्रॅव्हल्स थांबवत पाहिले असता वरील सर्व बॅग चोरी झाल्याचे लक्षात आल्याने याची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले.
चोरीची घटना धावत्या ट्रॅव्हल्सवर घडल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीनंतर चोर फरार झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेत चोरट्यांनी रोख रक्कम, दागिने आणि प्रवाशांच्या वैयक्तिक वस्तू असलेल्या बॅगा पळवल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पारगाव टोल नाक्याजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरांचा शोध सुरू आहे.
👉 स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळेत प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.




