डॉ.संपदा मुंडेंना न्याय मिळावा म्हणून टॉवरवर चढून आंदोलन !
SIT स्थापन करून, रूपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा.

फलटण : 29 ऑक्टोबर 2025 (प्रतिनिधी) डॉ. संपदा मुंडे यांनी चार दिवसापूर्वी फलटण येथील एका हॉटेलमध्ये पीएसआय व एकाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. डॉक्टर मुंडे या वडवणी तालुक्यातील कोटर बंद येथील रहिवासी होत्या, अतिथ गरिबीचे परिस्थिती त्यांनी शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाल्या होत्या.
डॉ. संपदा मुंडेना हत्येप्रकरणी न्याय मिळावा म्हणून बीड मधील आंदोलनकर्त्यांनी संतप्त होत टॉवरवर चढून जोरदार आंदोलन छेडले. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी “डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे”“दोषींना अटक करा”, “गृहमंत्री राजीनामा द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य उपसंचालक डॉ. संपदा मुंडे यांच्या हत्येची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी आणि या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनात मोहन आपाप, माधवी शिरसाट, केशव तांबडे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉ. संपदा मुंडेंच्या मृत्यूला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी भाजी मंडई परिसरात टॉवर समोर नागरिकांनी गर्दी केली होती.




