ब्रेकिंग न्यूज

डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी करुणा मुंडे काय म्हणाल्या पहा !

पोस्टमार्टम रिपोर्ट बदलणारे ते खासदार व पीए कोण ?

बीड(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कोटर बंद या मूळगाव रहिवासी असलेल्या व फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय वर्तुळात आणि वैद्यकीय क्षेत्रावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. करुणा मुंडे यांनी डॉ.मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत पोलीस व वैद्यकीय अधिकार्‍यावर संताप व्यक्त केला.

बोगस फिटनेस सर्टिफिकेट साठी पीएसआय बदने हे डॉ.संपदा मुंडेना दबाव आणत असल्याची सुसाईड नोटमध्ये परळीतील एका पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, या प्रकरणातील पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणणारे खासदार व त्यांचे दोन पीए कोण आहेत?याचा तपास करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.तसेच तीन महिन्यापूर्वी फिटनेस व पोस्टमार्टम साठी दबाव आणला जात असल्याने याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे करण्यात आली होती,परंतु वरिष्ठा कडून कोणती दखल न घेतल्याने डॉ.मुंडेंनी आत्महत्या केली असल्याने वैद्यकीय व पोलीस अधिकाऱ्यावर राज्यातून संताप व्यक्त होत आहे.

या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक संघटना, महिला कार्यकर्त्या आणि डॉक्टर संघटनांनी गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा,अशी जोरदार मागणी केली आहे.

डॉ. संपदा मुंडे यांचा मृत्यू हा केवळ आत्महत्या नसून, त्यांच्या वर झालेल्या मानसिक छळामुळे घडलेली दुर्दैवी घटना असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परळी येथील संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर तत्काळ निलंबन आणि अटक करण्यात यावी, तसेच या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी राज्यभरातून होत आहे.

    राज्य सरकारने डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी पारदर्शक तपास करावा व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button