
अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. सुधीर धर्मपात्रे यांचा भीषण अपघात
अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि २६ /१०/२५
अंबाजोगाई येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. सुधीर धर्मपात्रे यांच्या गाडीचा पुण्याहून अंबाजोगाई कडे येत असताना भीषण अपघात झाला असून, लोणी काळभोर परिसरात त्यांच्या सफारी गाडीचा ताबा सुटून ती रस्त्यावरील झाडास जाऊन धडकली. या अपघातात डॉ. धर्मपात्रे यांना गंभीर दुखापत झाली आहे.
या अपघातात त्यांच्या पत्नी व मुलालाही दुखापत झाली असून त्यांना तात्काळ पुण्यातील मास्टर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या तिघांवरही वैद्यकीय उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




