ब्रेकिंग न्यूज

कॉफी शॉपवर दमिनी पथकाची कारवाई.

११ मुलांवर प्रतिबंधात्मक कारवाई,गैरप्रकार होत असलेल्या लॉजवर धडक कारवाई करावीं.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय व वर्दळीच्या ठिकाणी कॉफिशॉप असल्याचे दिसत आहे.काही कॉफीशॉप मध्ये जोडप्यांना बसण्यासाठी स्वतंत्र केबिन करून”आंबटचाळे”सुरू होते.

 बीड पोलिसांनी मागील काही महिन्यात अश्या शॉप वर कारवाई करत केबिन काढण्याचे आदेश दिले होते.

 दिवाळीच्या काळात महिलांच्या सुरक्षेसाठी दमिनी पथकाने कॉफी शॉप तपासणी मोहीम सुरू केली आहे.दिनांक२५ ऑक्टोबर रोजी दुपारी बीड शहरासह गेवराई येथे पेट्रोलिंग दरम्यान दमिनी पथकाने विविध कॉफी शॉपची तपासणी केली. या तपासणीत कॉफी शॉपमध्ये गैरवर्तन करताना आढळलेल्या ११ मुलांवर मुंबई पोलिस अधिनियम कलम ११०/११७ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत बीड जिल्ह्यातील विविध कॉफी शॉपवर एकूण ४८ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच शाळा, कॉलेज, क्लासेस व हॉस्टेलच्या बाहेर उभे राहून मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंवरही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १६८ प्रतिबंधात्मक कारवाया मुंबई पोलिस अधिनियम कलम ११०/११७ अंतर्गत करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पल्लवी जाधव, सहाय्यक फौजदार मीरा रेडेकर, पोलिस हवालदार शोभा जाधव, अशोक शिंदे, पोलिस शिपाई उमिला म्हस्के आणि नेमपूक दमिनी पथक बीड यांनी केली.

बीड शहरातील काही राजकीय पदाधिकाऱ्याच्या लॉजवर देखील असेच गैरप्रकार होत असून अल्पवयीन जोडप्यांना रूम देऊन त्याची नोंद रजिस्टरवर होत नसल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे  त्या लॉजवर धडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button