सोरट जुगारावर बीड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई !
चार जुगारी अटकेत,61 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

बीड, दि. 22 ऑक्टोबर –बीड ग्रामीण पोलिसांनी बार्शी रोडवरील कोल्हारवाडी (ता. जि. बीड) परिसरात घेतलेल्या कारवाईत सोरट जुगारावर धाड टाकत चार आरोपींना ताब्यात घेतले असून, एकूण ₹61,400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त मिळालेल्या माहितीनुसार बार्शी रोडवरील कोल्हारवाडी येथे पाडव्यानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी जनावरांच्या टकरी आयोजित करण्यात आल्या होत्या. जनावराच्या टकरी पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली असताना काही जणांकडून सोरट जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून बीड ग्रामीण पोलिसांनी तत्काळ छापा टाकून दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली.
या कारवाईत
पहिल्या ठिकाणी — सोरट जुगार साहित्यासह रोख रक्कम, मोबाईल व मोसा असा ₹61,400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
दुसऱ्या ठिकाणी — सोरट जुगार साहित्यासह रोख रक्कम ₹1,460 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.
या दोन्ही प्रकरणांमध्ये चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.
ही कारवाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोज जोगदंड,पोलीस अंमलदार संतोष कोठुळे व युवराज पवार यांनी केली.
बीड ग्रामीण पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यासह जुगार व्यवसायाला आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




