
बीड (प्रतिनिधी)पेठ बीड पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील मोटारसायकल जप्त करून आरोपीस अटक केली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन पोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पेठ बीड पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार,ईमामपुरा रोड बाशीं नाका परिसरात इसम शामीरहुसैन शेख रा. मोहम्मदिया कॉलेज पेठ बीड हा एक हिरो होंडा स्प्लेंडर प्रो मोटारसायकल वापरत असल्याची माहिती मिळाली. ही मोटारसायकल क्रमांक MH-02-DD-3121 असून ती चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तत्काळ सापळा रचून बाशीं नाका परिसरात नमूद इसमास ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे असलेली मोटारसायकल क्रमांक MH-44-M-4197 ही देखील संशयित असल्याचे आढळून आले. तपासादरम्यान सदर वाहन हे गुन्हा क्र. 502/2024 कलम 303(2) भा.दं.सं. अंतर्गत चोरीसंबंधी असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी पोलिसांनी मोटारसायकल जप्त करून आरोपीस पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे केज येथे सुपूर्द केले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनित कॉवत, अपर पोलिस अधीक्षक, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.मुदिराज, पो.उपनि. शाह,पो.भाले, पो.ठोंबरे,पो.राठोड, पो.चौघुले आणि पो.भारती पोलीस यांच्या पथकाने केली.





